यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, सचिन गुजर, शिवसेनेचे अशोक थोरे, नागेश सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, अल्तमेश पटेल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारूती बिंगले, अभिजीत कुलकर्णी, अजित बाबेल, भाजप तालुकाध्यक्ष बबन मुठे, अरूण पाटील उपस्थित होते.
सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने किरकोळ व्यवसायाद्वारे उदरनिर्वाह करून उपनगराध्यक्ष ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहचलेले दिलीप गांधी हे असामान्य कर्तृत्व असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, गांधी हे राजकारणापलीकडे जाऊन संबंध जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सामाजिक, राजकीय कामाचा ठसा केवळ त्यांच्या मतदारसंघापुरता न राहता संपूर्ण जिल्हाभर किंबहुना मंत्री पदाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यभर होता. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी राजकीय हानी झाली आहे.
उपनगराध्यक्ष ससाणे म्हणाले, गांधी यांनी आयुष्यभर माणसांना जोडण्याचे काम केले. मैत्री करताना त्यांनी पक्ष विरहीत मैत्री केली. दिवंगत जयंत ससाणे व त्यांची अतिशय निर्भेळ मैत्री होती. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सतत जिल्ह्याच्या विकासासाठी मदत केली. त्यांचे निधन मनाला चटका लावून गेले आहे.
यावेळी भाजपाचे नगरसेवक किरण लुणिया, रवी पाटील, मिलिंदकुमार साळवे, राजेंद्र कासलीवाल, गणेश बिंगले, अक्षय नागरे, जसपाल सहाणी, राजू धामोने, अमित मुथा आदी उपस्थित होते.
----
आझाद मैदानावर दिवंगत दिलीप गांधी यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
..