नेवासा फाटा येथील पतंजली परिवहन कंपनीतून १५ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथील एस. एस. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये गायीच्या तुपाचे ७५० बॉक्स भरून दिले होते. हे तूप हवेली येथील कंपनीला पोहोच करावयाचे होते. ट्रकचालक वेद याने मात्र परस्पर या तुपाची मध्येच विल्हेवाट लावली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अमोल भाऊसाहेब थोरात यांनी फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने ट्रकचालक वदे याला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्यासह सहायक निरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉस्टेबल मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विशाल दळवी, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पतंजलीचे ६६ लाखांचे तूप चोरणारा ट्रकचालक जेरबंद
By | Published: December 08, 2020 4:18 AM