अहमदनगर : नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विजयी आणि पराभूत उमेदवार वगळता सर्वच्या सर्व २३ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत. प्रचारासाठी फिरुनही मोदीलाटेपुढे त्यांना त्यांची अनामत रक्कमही वाचविता आली नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात दुरंगीच लढती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर दक्षिणमध्ये १३ उमेदवार रिंगणात होते. दिलीप गांधी यांना ६ लाख ५ हजार १८५ मते पडली, तर राजीव राजळे यांना ३ लाख ९६ हजार ६३ मते पडली. अनामत रक्कम वाचवायची असेल तर एक लाखांच्यापुढे मतदान होणे आवश्यक आहे. मात्र नगर दक्षिणमध्ये गांधी-राजळे वगळता एकाही उमेदवाराला एक लाखांचा आकडा गाठता आला नाही. अनामत रक्कम जप्त झाली त्यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे किसन काकडे (८३३६), अजय बारस्कर ( ६००३), शिवाजी डमाळे (१३८५),आपच्या दीपाली सय्यद (७१२०), पोपट फुले (१०६१),अनिल घनवट (३०८६), बी. जी. कोळसे पाटील (१२६८३), विकास देशमुख (२२०२),पेत्रस गवारे (२५२५),लक्ष्मण सोनाळे (३४९७),श्रीधर दरेकर (५६४९) यांचा समावेश आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात होते. एक लाखांच्या पुढे जाणारे सदाशिव लोखंडे (५३२९३६) आणि भाऊसाहेब वाकचौरे (३३३०१४) हे दोनच उमेदवार होते. त्यांच्याशिवाय एकाही उमेदवाराला एक लाखांचा टप्पा गाठता आला नाही. त्यामध्ये आपचे नितीन उदमले (११५८०),अॅड. महेंद्र शिंदे (१०३८१), विजय पवार (२३३४), रघुनाथ मकासरे (३१९३),पोपट सरोदे (१४२९),संतोष रोहम (९२९६),उद्धवराव गायकवाड (१४९९), संदीप घोलप (२२२९),बाळासाहेब बागुल (४३१९), गंगाधर वाघ (२८७४), रवींद्र शेंडे (४७२८), सयाजी खरात (२९५४) यांचा समावेश आहे.(प्रतिनिधी) दीड लाख मतदान एकूण झालेल्या मतदानाच्या आकडेवारीच्या एक षष्ठांश मते उमेदवाराला मिळणे आवश्यक आहेत. त्याखाली मतदान झाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. खुल्या मतदारसंघासाठी २५ हजार रुपये, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या उमेदवारांसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम होती. नगरमध्ये १० लाख ५४ हजार वैध मतदान होते़ शिर्डीत ९ लाख २२ हजार वैध मतदान होते़
तेवीस जणांची अनामत जप्त
By admin | Published: May 17, 2014 11:53 PM