अहमदनगर : आयुर्वेद, युनानी, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘निमा’ने प्रस्तावित एनसीआयएसएम विधेयकाविरूद्ध सोमवारी (दि.६) पुकारलेल्या देशव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त देशभरातील डॉक्टरांनी दिल्ली येथे विराच मोर्चा काढला. त्यात नगर जिल्ह्यातून सुमारे तीनशे डॉक्टर सहभागी झाले.नीती आयागोद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम हा कायदा आणण्यात येऊ नये. त्यामुळे आयएसएम डॉक्टरांचे मुलभूत हक्क व अधिकार संपुष्टात येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या निमा या संघटनेच्या वतीने सोमवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला. देशभरातील डॉक्टरांनी दिल्ली येथे जाऊन या मोर्चात सहभाग नोंदवला. नगर जिल्ह्यातून या मोर्चासाठी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र मिरगणे, सचिव डॉ. प्रशांत महांडुळे, कोषाध्यक्ष डॉ. शांतीलाल कटारिया, निमा सेंट्रल कौन्सिलचे सदस्य डॉ. रमाकांत मडकर, डॉ. पारस कोठारी, डॉ. सुभाष बागले, डॉ. सईद शेख, डॉ. केवळ, डॉ. अविनाश मोरे, डॉ. रविकांत पाचारणे, डॉ. समीर सय्यद, डॉ. समीर होळकर यांच्यासह अडिचशे ते तीनशे डॉक्टर दिल्लीला गेले.
दिल्लीतील मोर्चात नगरचे तिनशे डॉक्टर सहभागी : ‘एनसीआयएसएम’ विधेयकाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 5:30 PM
नीती आयागोद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम हा कायदा आणण्यात येऊ नये. त्यामुळे आयएसएम डॉक्टरांचे मुलभूत हक्क व अधिकार संपुष्टात येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या निमा या संघटनेच्या वतीने सोमवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला.
ठळक मुद्देडॉक्टरांच्या मागण्या:एनसीआयएसएम हा प्रस्तावित कायदा आणू नये.भारतीय चिकित्सा पद्धती ही राष्ट्रीय चिकित्सा पद्धती घोषित करावी.भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण व्हावे.