शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

कुकडी प्रकल्पात अडीच टीएमसी पाणी

By admin | Published: July 11, 2016 12:34 AM

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रविवारी चोवीस तासात कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सुमारे अडीच टीएमसी पाणी आले आहे.

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रविवारी चोवीस तासात कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सुमारे अडीच टीएमसी पाणी आले आहे. त्यामुळे रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत ४ हजार ६७१ एमसीएफटी (१६ टक्के) पाणीसाठा झाला आहे.कुकडी नदीवरील चिलेवाडी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे येडगाव धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. येडगाव धरणात १ हजार १३७ (४० टक्के) पाणीसाठा झाला असून ३०९ मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. येडगाव धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. माणिकडोह धरणात १ हजार २७७ (१३ टक्के) पाणीसाठा झाला. पाणलोट क्षेत्रात ३५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडज धरणात २७७ (२४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात २३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४९३ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मृतसाठ्यात ३ हजार १०० एमसीएफटी पाणीसाठा आहे. सोमवारपासून उपयुक्त पाणीसाठ्यात पाणी येईल, अशी आशा आहे. घोड नदीवरील डिंबे धरणात १ हजार ९७७ (१६ टक्के) पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात ३०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिलेवाडी तलावात ०६७७ एमसीएफटी पाणी आले आहे. दरवाजे बसविण्याचे काम अपूर्ण असल्याने हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.घोड धरणात पाण्याची आवक डिंबे धरणाच्या खालील बाजूस चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे घोड नदीला पाणी आले आहे. घोड धरणात सोमवारपासून काही प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे. सध्या घोड धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.