श्रीरामपूर : खुनाच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघा आरोपींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता पोलिसांना हिसका देऊन दोघेही बेड्यांसह फरार झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.फरार झालेल्या आरोपींची नावे सचिन काळे (मुठेवाडगाव) व भौदू भोसले (रा.कानडी, ता.आष्टी) अशी आरोपींची नावे आहे. शनिवारी पोटात दुखू लागल्याने त्यांना शिरसगाव हद्दीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तेथे पोलिसांना हिसका देऊन त्यांनी पळ काढला.
सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून झालेला वादातून झालेल्या मुठेवाडगाव येथे त्यांनी एका तरुणाचा खून केला होता. शिरसगाव शिवारातून भौदू भोसले या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसºया फरार आरोपीचा अद्याप शोध सुरु आहे. शिरसगाव, हरेगाव, वडाळा महादेव, खानापूर परिसरात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत.
आरोपी काळे हा खानापूर शिवारात पसार झाल्याची माहिती रविवारी पोलिसांना मिळाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
मुठेवाडगाव शिवारात ८ मार्च २०२० रोजी मध्यरात्री लोंखडी पाईप व तलवारीने वार करुन मयुर काळे (वय २८) याचा खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. त्यातील हे दोघे आरोपी आहेत. -------पोलिसांनी केली उसाची नासाडीशिरसगाव हद्दीतील सुदर्शन लक्ष्मण निकाळे यांच्या उसाच्या शेतात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेतला. मात्र तेथे आरोपी मिळून आले नाहीत. यादरम्यान उसाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकºयाने आपण गरीब असून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.----------यापूर्वीही आरोपी झाले फरारयापूर्वीही ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या एका रुग्णाने पळ काढला होता. सातत्याने अशा घटना घडत असताना पोलीस प्रशासनाने मात्र त्यातून कुठलाही बोध घेतलेला नाही. त्यावरून टीकेची झोड उठली आहे.