श्रीगोंदा : बनावट शेतकरी उभा करुन दुस-याची शेतजमीन परस्पर विक्री करण्यासाठी नोटरीचा खोटा व्यवहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आजपर्यंत दोघांना अटक केली आहे.
शिरुर तालुक्यात टाकळी हाजी येथे अण्णासाहेब तारडे यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीची विक्री करण्यासाठी श्रीगोंदा येथे नोटरी वकिलाकडे इसार पावती करण्यात आली. तारडे यांच्या नावाने बनावट शेतकरी उभा करुन ही नोटरी करण्यात आली.
याप्रकरणी नोटरी करणारे वकील रामभाऊ कौठाळे (श्रीगोंदा), मुद्रांक खरेदी केलेला इसम एस.एस. साबळे (बारामती), जमीन खरेदी करणारा नवनाथ मारुती भुजबळ व आणखी एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपासात आतापर्यंत भुजबळ व भगवान राऊत (मखरेवाडी) यांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी सात ते आठ जणांचा सहभाग असल्याचे दिसत असून त्यांचा शोध सुरु आहे, असे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सांगितले.