अहमदनगर: नगर तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे वृद्ध व्यक्तीचा खून करणा-या सात जणांपैकी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी नगर शहरातून अटक केली. यात एका महिलेचा समावेश आहे. रमेश मोतीलाल काळे (वय ४५) व कलकाबाई रमेश काळे (रा़ दोघे रा. मोहोरवाडी ता. कोळगाव ता़ श्रीगोंदा) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांसह त्यांचे साथीदार अलुशा रमेश काळे, गिल्या रमेश काळे, सतीश नवकशा भोसले, छत्तीस नवकशा भोसले, हुल्या पंडित भोसले यांनी मिळून ४ जानेवारी रोजी पिंपळगाव पिसा येथे हस्तीमल चाफ्या काळे (वय ७०) यांचा पिंपळगाव पिसा येथे मारहाण करून खून केला होता. याप्रकरणी मयताचा मुलगा किशोर काळे याने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींना अटक केली.
वृद्धाच्या खुनप्रकरणातील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:39 PM