श्रीरामपूर : बेलापूर-पढेगाव रस्त्यावर असणा-या कानिफनाथ मंदिराजवळ मंगळवारी काटवनात एका तरुणाने आत्महत्या केली. श्रीरामपूर रस्त्यावर एक वृध्द इसमाचा मृतदेह आढळून आला. एकाच दिवशी या दोन घटना घडल्यामुळे संपूर्ण गाव हादरले. आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव रवींद्र अरुण पाटोळे (वय २६) आहे. तो बेलापूर येथील असून त्याने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबतची फिर्याद मयताचा भाऊ सुभाष पाटोळे याने बेलापूर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच अनेकांंनी बेलापूर पोलीस ठाण्यात गर्दी केली. रवींद्र याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, श्रीरामपूर रस्त्यावर एका हॉटेलनजीक वृद्धाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटू शकली नाही. हवालदार अतुल लोटके हे घटनांचा तपास करीत आहेत.
बेलापूरात दोन मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:15 AM