केडगाव : नगर तालुक्यातील अरणगाव येथे शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य मोरे व अनुज मोरे असे या मुलांची नावे आहेत.सुट्टी असल्यामुळे मोरे परिवारातील तिघे जण जांभळे खाण्यासाठी गेले होते. शेजारीच असलेल्या शेततळ्यात अनुज पाणी काढण्यासाठी गेला. पाणी काढताना सोबत पाण्याची बाटली शेततळ्यात पडली. अनुज खाली उतरला असता तो शेततळ्यात पडला. त्याला हात देण्यासाठी आदित्य गेला असता तोही शेततळ्यात पडला. त्यांच्यासोबत असणारा तिसरा सात वषार्चा मुलगा घाबरल्याने तो घरी पळून घरी गेला. त्याने काही वेळ कोणालाच काही सांगितले नाही. परंतु काही वेळाने कुटुंबीयांनी शोधाशोध केल्याने आणि छोट्या मुलाला विचारले असता, तो छोटा मुलगा घरच्यांना घेऊन शेततळ्यावर गेला. तोपर्यंत शेततळ्यात पडलेल्या दोघांचा मृत्यू झालेला होता. ग्रामस्थांनी त्यांना शेततळ्यातून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात हलविले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.आदित्य मारूती मोरे, (वय 10 वर्षे), अनुज दत्तात्रेय मोरे (वय 13 वर्षे) यांचा शेततळ्यात बुडुन मृत्यू झाला आहे. दोघे नात्याने चुलते-पुतणे आहेत.
अरणगावात शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 6:50 PM