शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

भीषण अपघातात हळगांवमधील दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 4:30 PM

अहमदनगर - सोलापूर महामार्गावरील मांगी ( ता. करमाळा ) शिवारातील अवघड वळणावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले

हळगांव : अहमदनगर - सोलापूर महामार्गावरील मांगी ( ता. करमाळा ) शिवारातील अवघड वळणावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले दोघे जामखेड तालुक्यातील हळगांव येथील रहिवासी होते. कामावरून परतत असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेने हळगांवसह परिसरावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना काल 3 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली.जामखेड तालुक्यातील हळगांव गावांतील गबारवस्ती येथील मथुरदास गोरख कापसे, बाबासाहेब रंगनाथ कापसे, कांतीलाल दादासाहेब कापसे हे तिघे तरूण शेतकरी रोजगारासाठी शेजारील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील जेऊर भागात विहीर बांधकामाच्या कामासाठी गेले होते. काल ३ नोव्हेंबर रोजी जेऊरहून करमाळा मार्गे हळगांवकडे परतत असताना सोलापूर - अहमदनगर मार्गावरील मांगी शिवारात असलेल्या टोलनाक्याच्या पुढील अवघड वळणावर मोटारसायकलला कंटनेरने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा अक्षरश : चक्काचूर झाला. या भीषण अपघातात मथुरदास कापसे हा तरूण जागीच ठार झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब कापसे व कांतीलाल कापसे या अन्य दोघांना करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. अहमदनगर येथून हळगांवला आणल्यानंतर बाबासाहेब कापसे यांचे काही वेळातच निधन झाले.मृतक मथुरदास कापसे व बाबासाहेब कापसे हे दोघे एकाच वस्तीवर राहणारे तरूण होते. अपघातात दोघांचा झालेल्या दुदैर्वी मृत्यूने हळगांव परिसरावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या अपघातातील जखमी कांतीलाल दादासाहेब कापसे याच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.मागील वर्षी ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी एकाच परिवारातील दोघांचा मृत्यू झाल्याने मागील वषीर्ची दिपावली हळगांवकरांसाठी ' काळी दिवाळी' ठरली होती. आता यंदाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हळगांव मधील दोघां तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळगांव गावांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड