अहमदनगर : पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून नगर जिल्ह्यातील वेगवेळ्या भागात वास्तव्य केलेल्या दोन परदेशी नागरिकांना न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर तिघा भारतीयांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.या पाच नागरिकांना रुग्णालयातून सोडल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शुक्रवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. याआधी २६ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जैबुती, फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, घाणा इंडोनेशिया या देशातून आलेले २९ परदेशी व त्यांच्याबरोबर सहा भारतीय नागरिक असे ३५ जण नगर , जामखेड, नेवास येथे राहिले होते. त्यांच्याविरुदध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील काही जणांना करोनाची लागण झाली होती. तर काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील २६ परदेशी, तीन भारतीय अशा २९ जणांना अटक झाली आहे. तर इंडोनेशिया व जैबुती येथे दोघांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. त्यात दोघे इन्स्टिट्यूटशन क्वारंटाईन होते. या दोघांसह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान येथील तिघे असे पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आतापर्यत तीनही गुन्हयात ३४ जणांनी अटक झाली आहे. एक परदेशी नागरिक क्वारंटाईन आहे. त्याला सोडण्यात आल्यानंतर अटक करण्यात येणार आहे.
दोन परदेशी नागरिकांना १३ मेपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 4:14 PM