कोतुळ : बुधवारी रात्री आठच्या सुमारास कोतुळ येथील बाजरतळ , अण्णाभाऊ साठेनगर, बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कारणांमुळे दोन गटात झालेल्या हाणामारीत आठ ते दहा जण जखमी झाले.अचानक पन्नास ते साठ लोकांच्या जमावाने अचानक केलेल्या या धुमश्चक्रीत काठ्या, गज व इतर हत्यारांचा सर्रास वापर करण्यात आला. भर बाजारात हा प्रकार घडल्याने गावक-यांची एकच पळापळ झाली. हा प्रकार घडत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. त्यामुळे आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. पोलिसांसमोरच हाणामारी सुरू असताना ते हतबलपणे हा सारा प्रकार बघत होते. पोलिसांनी जमावास वेळीच पायबंद न घातल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त होत आहे.याप्रकरणी मोहन सखाराम खरात व दत्तात्रय निवृत्ती खरात यांनी अकोले पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यावरून अक्षय लहानु खरात, मोहन सखाराम खरात, लहानु वामन खरात, गुलाब भिका खरात, अमोल भिका खरात, सहादू मारूती खरात, सचिन रमेश खरात , अनिल व पप्पू भाऊसाहेब खरात, नंदू भगवंत खरात, मंदा भिकाजी खरात, चंद्रकांत मुरलीधर खरात, पुंजीराम मुरलीधर खरात, मीना भाऊसाहेब गायकवाड, दत्तात्रय निवृत्ती खरात, अनिल निवृत्ती खरात, विजय बाबूराव खरात, संकेत पांडुरंग खरात , पांडुरंग बाबूराव खरात, रंगनाथ बाबूराव खरात, साहेबराव बाबूराव खरात, सोनल दत्तात्रय खरात, ताई विजय खरात, लक्ष्मीबाई निवृत्ती खरात, मोनाली निवृत्ती खरात, मंगल रंगनाथ खरात अशा परस्पर विरोधी एकूण ३१ जणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा तसेच दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार नितीन बेंद्रे, सुनील साळवे तपास करीत आहेत.
कोतुळमध्ये दोन गटात धुमश्चक्री: गज, काठ्यांचा हाणामारीत वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 3:51 PM