घारगाव शिवारात मोठा अपघात, अहमदनगरमधील दोघे ठार
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : नगर- दौड रोडवरील घारगाव शिवारातील निलगिरी हॉटेलनजीक झालेल्या महाराष्ट्र शासनाची जीप व खाजगी ट्रक यांच्या भीषण अपघातात माथाडी महामंडळातील निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढे ( वय 57) रा अहमदनगर त्यांचा चालक अशोक पुंजबा औटी (वय 48) दोघेही रा. अहमदनगर हे जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झाला.
समजलेली माहिती माथाडी कामगाराचे निरीक्षक निवृत्ती लोंढे हे राशीनवरून श्रीगोंदामार्गे नगरकडे जीप (क्रमांक एम एच 17 ए एन 0052) मधून चालले होते. दौडकडे या ट्रकने (क्र एम एच 12जे एस 9444) बोलेरोला समोरून धडक दिली आणि दोघांचा या अपघातात दुुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समाजताच बेलवंडी पोलिसचे निरीक्षक अरविंद माने व त्यांच्या टीमने घटनास्थळाकडे धाव घेतली.
या भीषण अपघातात मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी गॅस कटरचा वापर केला. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, गवळी, संभाजी शिंदे , ज्ञानेश्वर पठारे, नंदकुमार पठारे, चालक भाऊ शिंदे, धांडे, भांडवलकर यांना पोलिस पाटील सतिश निभोंरे सतिश लगड कैलास खोमणे विनायक चौधरी रमेश मोळक रमेश लगड या स्थानिक तरुणांनी मोठी मदत केली.