संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवरील कुबेर फाउंडेशन समूहाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
मदतीचा धनादेश संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे
यांच्याकडे शुक्रवारी सुपुर्द करण्यात आला. यावेळी कुबेर फाउंडेशनचे सदस्य ॲड. प्रशांत गुंजाळ, सचिन गणोरे, शोहराब पठाण, अमोल बस्ते, प्रथमेश बेल्हेकर, गौरव डोंगरे, कृष्णा कापकर आदी उपस्थित होते.
साधारणपणे आठ वर्षांपूर्वी संगमनेर येथील उद्योजक संतोष जगन्नाथ लहामगे यांनी फेसबुकवर कुबेर नावाच्या समूहाची स्थापना केली. शिक्षण, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रातील अडीच हजार समविचारी लाेक या माध्यमातून एकत्र आले आहेत. या माध्यमातून त्यांनी नदीचे रुंदीकरण, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, शालोपयोगी वस्तूंचे वाटप , व्यसनमुक्ती केंद्र, अनाथ आश्रम, वृद्धाश्रमांना मदत आदी उपक्रम राबवित आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाख रुपयांचा निधी द्यावा, असा ठराव फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष लहामगे, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, कार्याध्यक्ष चंद्रकांत माने, सचिव मीनल गिरडकर, खजिनदार नंदू सावंत, प्रवक्ते डॉ. प्रशांत दौंडकर, सर्व संचालक मंडळ, सदस्य डॉ.अभिजित कदम, ॲड. लीना प्रधान गुरव, जतीन तिवारी, शैलेश कलंत्री, अमेय सोनावणे, नितीन नरखडे, प्रशांत दाते, विजया शिंदे, राहुल बेलदरे यांनी केला.
---
०८ कुबेर
कुबेर फाउंडेशनने मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाखांची मदत दिली. मदतीचा धनादेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.