संगमनेर : ग्रामीण रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमधून गुरूवारी (२ जुलै) दोन जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत या सेंटरमध्ये उपचार घेऊन २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
जिल्हा रूग्णालयात तीन, येथील कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये पाच अशा संगमनेर तालुक्यातील आठ जणांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. बरे होऊन गुरूवारी घरी सोडण्यात आलेल्यामध्ये शहरातील दोन पुरुषाचा समावेश आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर, डॉ. संदीप कचेरिया, डॉ.अमोल कासार आदींनी त्यांच्यावर उपचार केले.