जामखेड - कोरोना पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर नियुक्तीवर असणार्या कर्मचाºयांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपास रात्रीच्या वेळी अज्ञात दुचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये बांबू व खुर्च्या तोडून नियुक्तीवर असलेल्या शिक्षकाच्या डोक्याला पायाला व कमरेला मार लागला आहे. यानंतर दुचाकीस्वार वाहन घेऊन फरार झाला आहे. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून चेकपोस्टवर सुविधांचा अभाव असल्.ाते समोर आले आहे.
मंगळवारी लक्ष्मी चौकात रात्री आठ ते सकाळी आठ नियुक्तीवर असणारे शिक्षक उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे व होमगार्ड दगडे हे नियुक्तीवर होते. रात्री ११. ३० ते ११.४५ च्या दरम्यान एका अज्ञान दुचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने मंडपाचे बांबू तुटले. मंडपातील तीन खुर्च्याची मोडतोड झाली. खुर्चीवर बसलेले शिक्षक उदयकुमार दाहितोडे यांना धडक दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला, पायाला व कमरेला चांगला मार बसला. या घटनेनंतर मोटारसायकलस्वार पसार झाला.
नियुक्तीवर असणारे पोलीस कर्मचारी गैरहजर होते. तसेच चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे. मंडपाशेजारी पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव असतो अशा ठिकाणी बारा तास शिक्षकांना थांबावे लागत आहे. तसेच ५५ वर्षांवरील शिक्षकांना व जे आजारी आहेत त्यांनाही नियुक्ती दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. काम करण्यास सर्व शिक्षक तयार आहेत पण बरोबर पोलीस हवेत तसेच चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे.
मंडपाच्या बांबूला रेडिअम लावणे, बारा तासाऐवजी आठ तास दिवटी द्यावी. तालुक्यात सहा चेकपोस्टवर पोलीसांना मदत म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस बारा तास नियुक्ती देण्यात आली आहे. तर कॉरन्टाईन केंद्रावर दररोज आठ तास नियुक्ती देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ते दिसत नाही. त्यामुळे बॅरिकेटवर रेडीअम व सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे अशी मागणी नियुक्तीवर असणाºया कर्मचाºयांतून होत आहे.
( फोटो - जखमी शिक्षक उदयकुमार दाहितोडे)