रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या १५ पैकी दोन जणांची ओळख पटलेली नाही तर अपघातात मृत्यू झालेल्या ३४ पैकी ९ जणांची अद्यापपर्यंत ओळख समोर आलेली नाही. विविध कारणांमुळे महिला, पुरुष अथवा तरुण रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवितात. या घटनेत शरीर छिन्नविछिन्न होत असल्याने बहुतांशी जणांची ओळख पटविणे मुश्किल होते. अपघाताच्या घटनांमध्येही मयतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक होते. प्रयत्न करूनही ज्या मयतांची ओळख समोर येत नाही त्यांच्यावर नियमानुसार अत्यंविधी केला जातो. तसेच लोहमार्गावर मृत्यू झालेल्यांची ओळख पटविण्यासाठी माध्यमांकडे प्रसिद्धीपत्र दिले जाते. मिसिंग तक्रांरीची माहिती घेतली जाते. यातून बहुतांशी मयतांची ओळख समोर येते.
लोहमार्ग ओलांडताना निष्काळजी
आत्महत्येबरोबरच अनधिकृतपणे लोहमार्गावरून चालवणे निष्काळजीपणाने हा मार्ग ओलांडणे यामुळे अपघात होतात. तसेच कानात हेडफोन घालून लोहमार्ग ओलांडणे घातक ठरत आहे. हेडफोनमुळे लोहमार्गावरून येणाऱ्या गाडीचा व हॉर्नचा आवाज ऐकायला येत नाही. त्यामुळे अपघात होऊन जीव जातात. लोहमार्गावरील इतर वाहनांसाठीचा मार्ग बंद केल्यानंतरही बहुतांशी जण लोखंडी गेटच्या खालून जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळीही अपघातांचे घटना घडतात.
सूचनांकडे दुर्लक्ष
रेल्वे स्थानकावर तसेच लोहमार्गावर विविध ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून सूचना फलक लावलेले असतात. बहुतांशी जण मात्र याकडे दुर्लक्ष करून लोहमार्ग ओलांडतात. अशावेळी अपघात होतात.
२०१९
रेल्वे अपघातात मृत्यू - २४- आत्महत्या १२
२०२० रेल्वे अपघातात मृत्यू- १०-आत्महत्या ३