काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौघुले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या कार्यालयाचे नायब तहसीलदार खरात यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांसमोर जिल्हा उपाध्यक्ष पंकज लोंढे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष रमेश गागरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके, नितीन सदाफळ, सचिन गाडेकर, गणेश चोळके आदींनी भूमिका मांडली. या वेळी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे, जिल्हा सरचिटणीस उमेश शेजवळ, स्वराज त्रिभुवन, आदित्य चव्हाण, अर्बाज कादरी, आनंद घेगडमल, संतोष वाघमारे, मंगेश खाकाळे, राजेंद्र गायके, प्रवीण घोडेकर, सुवरनेश साबळे, मोसिन सय्यद, डॉ. गोविंद भडांगे, दिलीप नळे, गणेश चोळके, दादासाहेब गवांदे, अमोल आरणे, राहुल बर्डे, विजय पवार, अनिस शेख, असीम बेग आदी पदाधिकारी उपस्थित होते.