शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

महापालिकेचे स्थायी समितीचे बेकायदेशीर ठराव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:47 AM

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभांचे इतिवृत्त लिहिताना काही विषय ऐनवेळी घुसडण्यात आले होते. असे तब्बल १८ विषय राज्य शासनाने रद्द केले आहेत.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभांचे इतिवृत्त लिहिताना काही विषय ऐनवेळी घुसडण्यात आले होते. असे तब्बल १८ विषय राज्य शासनाने रद्द केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला चांगलाच दणका बसला आहे. याबाबतचे नगरविकास खात्याचे पत्र गुरुवारी महापालिकेला प्राप्त झाले.महापालिकेच्या सभेचे इतिवृत्त लिहिताना ‘तसेच’ हा शब्द जोडून सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर नसलेले व सभेत चर्चा न झालेले विषय घुसडले जातात. नगरसेवकांशी संबंधित व आर्थिक विषय ‘तसेच’ हा शब्द जोडून मूळ विषयांच्या मंजुरीसह या विषयांना बेकायदेशीरपणे मंजुरी दिली जाते. यात राजकीय लागेबांधे असल्याने अशा विषयांवर चर्चा कधीच होत नव्हती. मात्र याबाबत जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी थेट राज्य शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्याने मुळे यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार दिलीप गांधी यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी होऊन अखेर शासनाने सदरचे ठराव रद्द केले आहेत. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना गुरुवारी सायंकाळी मिळाले. ‘जागरूक’चे मुळे यांनी स्थायी समितीच्या १० एप्रिल २०१७ रोजी झालेल्या सभेतील बेकायदा ठरावांसह १६ फेब्रुवारी २०१७, ३ जून २०१७, ३ जुलै २०१७ व १७ डिसेंबर २०१६ या पाच सभांमध्ये ‘तसेच’ शब्दाच्या आधारे झालेल्या बेकायदा ठरावांची माहिती संकलित केली होती. तक्रारीतील संबंधित पाच ठरावांवर नगरसेवक दिलीप सातपुते, मनोज दुलम, मुदस्सर शेख, बाळासाहेब बोराटे, सुनीता भिंगारदिवे, सुनीता फुलसौंदर, उषा नलावडे आदी नगरसेवकांची सूचक व अनुमोदक म्हणून नावे आहेत. ‘तसेच’ शब्दाआधारे झालेल्या ठरावांची माहितीच नसल्याचा पवित्रा संबंधित नगरसेवकांनी घेतला आहे.

हे होते वादग्रस्त विषयमहादेव कोलते (बोल्हेगाव रोड, नागापूर) यांच्याकडे नळ कनेक्शन नसल्याने त्यांना आकारलेली पाणीपट्टी निर्लेखित करणे डॉ. संदीप सुराणा यांना आरक्षण क्रमांक ७० या आरक्षित भूखंडात विकसित करून तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला असे १८६ चौरस मीटर बांधकाम करण्यास मंजुरी देणे. महापालिकेची रिकामी मिळकत ११ वर्षे मुदतीने देणे.विलास काळभोर (बोल्हेगाव रोड, नागापूर) यांची पाणीपट्टी निर्लेखित करणे.राज चेंबरमधील बिल्डिंग बी शेजारील खुल्या जागेपैकी १५ बाय ३५ चौरस फूट मोकळी जागा नईमोद्दीन काझी यांना देणे.गजानन पंगुडवाले यांना प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रालगतची १० बाय १५ चौरस फूट मोकळी जागा व्यवसायासाठी ११ वर्षे मुदतीने देणे.एमआयडीसी एल व एम ब्लॉकमधील रोहिदास वाबळे व अन्य सात जणांची घरपट्टी निर्लेखित करणे.विद्या कॉलनी ते शितळे घर ते समता कॉलनी ते भंडारी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण .छबुबाई विश्वनाथ ठोंबे यांना नळ कनेक्शन नसताना आकारलेली ११ हजार ५१३ रुपयांची पाणीपट्टी निर्लेखित करणे.मोहित मदान यांना नोबल हॉस्पिटललगत व राजेंद्र सैंदर यांना जुना दाणे डबरा ते ग्राहक भांडार परिसरातील जागा पे अँड पार्किं गसाठी भाडेतत्त्वावर देणे.प्रमोद ठुबे यांना केडगाव अंबिकानगर बसस्टॉपजवळील बालाजी कॉम्प्लेक्सशेजारील १० बाय १५ फूट मोकळी जागा व्यवसायासाठी देणे. महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात परिचारिका पुनर्नियुक्ती करणे.सागर भालेराव यांना गाडगीळ पटांगण शॉपिंग सेंटर भाजी मार्केट भिंतीलगत खुल्या जागेपैकी १० बाय १० चौरस फूट जागा व्यवसायासाठी देणे.अजिंक्य नांगरे यांना नवीन एसटी स्टँड, स्वस्तिक चौक येथे १० बाय १२ चौरस फूट मोकळी जागा व्यवसायाकरिता भाडेतत्वावर देणे. गणेश शिंदे व गोपीनाथ कवडे यांच्या जागेचे भाडेकरार वाढवून देणे. हेमंत पांडे (तांगेगल्ली, नगर) यांना  २० बाय १५ चौरस फूट जागा व्यवसायासाठी भाडेतत्वावर देणे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका