श्रीरामपूर : बंद पडलेल्या श्रीरामपूरच्या मुळा- प्रवरा वीज सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यामुळे अखेर निवडणुकीलाच सामोरे जावे लागणार आहे.आतापर्यंत संस्थेत एकमेकांच्या विरोधात राजकारण करणार्या सर्व प्रमुखांनी निवडणूक टाळून बिनविरोध संचालक मंडळ निवडण्यासाठी फिक्सिंग केले. पण हे फिक्सिंग शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, विखे विरोधक अरुण कडू व इतरांनी हाणून पाडीत निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न चालविले होते. स्थानिक पातळीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे पटत नसल्याने ससाणे यांचा बिनविरोधला विरोध होता. तरीही त्यांना यासाठी राजी करण्यात आले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १३ जागांसाठी ३४ उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. राहात्याचे सहायक निबंधक आर. एल. त्रिभुवन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.मतदार संघ निहाय उमेदवारांची नावे:- भटक्या जाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग: नगरसेवक संजय छल्लारे (श्रीरामपूर), भास्कर फणसे (हणमंतगाव), पांडुरंग शिंदे (गळनिंब).अनुसूचित जाती, जमाती : चित्रसेन रणनवरे (टाकळीभान), पोपट गायकवाड (श्रीरामपूर), वसंत ब्राम्हणे (धानोरे).इतर मागास प्रवर्ग: नितीन पटारे (कारेगाव), रमजान शहा (श्रीरामपूर), मच्छिंद्र अंत्रे (सोनगाव).श्रीरामपूर शेती: नितीन पटारे (कारेगाव), गंगाधर पाटील (शिरसगाव), इंद्रभान थोरात (उक्कलगाव).बाभळेश्वर शेती: अंबादास ढोकचौळे (रांजणखोल), अरुण कडू (सात्रळ), बाबासाहेब निर्मळ (पिंप्री निर्मळ), पांडुरंग शिंदे (गळनिंब), सुजय विखे (लोणी बुद्रक).श्रीरामपूर घरगुती, व्यापारी, औद्योगिक: अमजद कुरेशी, सिद्धार्थ मुरकुटे, गंगुबाई पवार, जलीलखान पठाण, युनूस शेख.बाभळेश्वर घरगुती, व्यापारी, औद्योगिक : दगडू भांड, नारायण घोरपडे, दीपक शिरसाठ, देविचंद तांबे.महिला राखीव : तमीजबी शेख, मंदाकिनी तुवर (श्रीरामपूर), शशीकला सुभाष पाटील (वांबोरी), रतनबाई तुकाराम बेंद्रे (बाभळेश्वर).(प्रतिनिधी)
बिनविरोधचे 'फिक्सिंग' फसले
By admin | Published: December 22, 2015 4:49 PM