एरंडगाव : भानुदास... एकनाथ महाराजांच्या नावाचा जयघोष करीत दिंड्या हळूहळू पैठण नगरीकडे प्रस्थान करु लागल्या आहेत. एकनाथ षष्ठीनिमित्त दूरवरुन भविक दिंड्याच्या माध्यमातून पैठणला येत असतात. दरवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांची उपस्थिती कमी दिसून येत आहे. कोरोना व्हायरसमुळे नाथषष्ठी महोत्सवावर जिल्हा प्रशसनाने सावधगीरीचा उपाय म्हणून घातलेली बंदी घातली आहे. यामुळे अनेक भविक दिंडी सोडून लवकर पुढे जावून दर्शन घेऊन माघारी फिरत आहेत. प्रशासन जरी दक्ष असले तरी भाविकांची होणारी गर्दी व प्रशासनावर येणार ताण यावर उपाययोजना व दक्ष राहणे गरजेचे आहे. भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवक, ग्रामस्थांच्याकडून चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली जात आहे.
कोरोनाच्या सावटाखाली दिंड्या निघाल्या पैठणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:53 PM