तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मोहज खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी क्लबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय डे-नाइट कबड्डी स्पर्धेत उंदीरगावचे भारतीय क्रीडा मंडळाचा संघ विजेता ठरला. प्रभूवडगावच्या प्रभुनाथ स्पोर्ट्स क्लबला (उपविजेते) द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भारत वांढेकर, प्रा. दादासाहेब वांढेकर, माजी सरपंच रामकिसन वांढेकर यांनी केले होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ३५ कबड्डी संघाने भाग घेतला होता. स्पर्धेची सांगता रविवारी झाली. यावेळी ११ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस उंदीरगाव संघाने पटकावले. सात हजारांचे बक्षीस प्रभुनाथ स्पोर्ट्स क्लबने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. पाच हजारांचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस मोहज खुर्दच्या शिव मल्हार स्पोर्ट्स क्लबने बक्षीस मिळवले. चौथ्या क्रमांकाचे अडीच हजारांचे बक्षीस जोडमोहोजच्या छत्रपती स्पोर्ट्स क्लबने जोडमोहोज या संघाने चतुर्थ बक्षीस पटकावले. प्रा. दादासाहेब वांढेकर, लक्ष्मण लांडगे मेजर, माजी सरपंच सुधाकर वांढेकर व भारत वांढेकर यांनी या स्पर्धेसाठी बक्षीस जाहीर केले होते.
यावेळी माजी सरपंच सुधाकर वांढेकर, ज्येष्ठ नेते विष्णू बोरुडे, सुरेश ठोकळ, पोपटराव वांढेकर, भाऊसाहेब वांढेकर, संजय वांढेकर, नवनाथ वांढेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पिसे,भगवान वांढेकर, दिलीप वांढेकर, जे. बी. वांढेकर, शिवाजी वाढेकर, मुरलीधर वांढेकर, उद्धव दुसंग, राज कराळे, बबन वाडेकर, दिनकर वाडेकर, पोपटराव वाढेकर, पिंटू खाडे, डॉ. संतोष वांढेकर, दत्तू वांढेकर, अशोक टेमकर, संभाजी औटी, सुनील मतकर, सुभाष वाढेकर, गणेश पिसे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून लक्ष्मण लांडगे मेजर, अतुल ठोकळ, राहुल ब्राह्मणे, रवींद्र कराड, सागर शिंदे, मस्तान शेख, सुनील गाडेकर यांनी काम पाहिले.