शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

निळवंडेच्या कॅनॉलमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 3:37 PM

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कोरड्या कालव्यात अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रविवारी ( दि. १९ ) रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कोरड्या कालव्यात अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रविवारी ( दि. १९ ) रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कोरड्या कालव्यात अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांना मिळाली. श्री. सुपेकर यांनी याबाबत खात्री करून संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. परमेश्वर गायकवाड, लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी तातडीने घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेत संगमनेर येथे उत्तरीय तपासणीसाठी हलविला. मृताच्या नाकातून व डाव्या कानातून रक्त बाहेर आले होते. मृताच्या शरीरावर गुलाबी फुलबाहीचा शर्ट, शर्टचे आतुन पांढरे बनियान, बनियनचे आत निळे रंगाचा टी शर्ट, निळे रंगाची अंडरवेअर, निळ्या रंगाची फुल पॅन्ट असे मृताच्या पेहरावाचे वर्णन आहे. याप्रकरणी पोलीस पाटील नानासाहेब लक्ष्मण सुपेकर यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. लक्ष्मण औटी, हे. कॉ. बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे. वरील वर्णनाच्या इसमाबाबत कुणाला काही माहिती असल्याचा संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी केले आहे.