यांनी त्यांचा सत्कार केला. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली.
यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता अशोक फरांदे, संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तारसंदर्भात माहिती दिली.
यावेळी धोत्रे यांनी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाच्या सोलर युनिटला आणि आंतरविद्या जलसिंचन विभागाच्या सिंचन उद्यानास भेट दिली. याच बरोबर कास्ट प्रकल्पाच्या ड्रोन प्रात्यक्षिकाची पाहणी केली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महानंद माने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके उपस्थित होते.