हा जनता लाॅकडाऊन जनतेला वेठीस धरणारा आहे. जीवनावश्यक वस्तूच्या किमती चढ्या भावाने करून अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने व्यापाऱ्यांनी हा लाॅकडाऊन केला आहे. राहुरी येथील सरकारी दवाखाना तसेच इतर शासकीय वैद्यकीय यंत्रणा या प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
तरीही हे लाॅकडाऊन गरीब जनतेला उपाशी मारणारे आहे. लाॅकडाऊन करण्याआधी प्रत्येक गोरगरीब जनतेचा लाॅकडाऊन काळात पुरतील इतक्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा तात्काळ पुरवठा करावा. तसे न केल्यास हा लॉकडाऊन आम्हाला मान्य राहणार नाही. केलेली मागणी पूर्ण न करता लाॅकडाऊन करण्याचा प्रयत्न केल्यास ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लाॅकडाऊन विरुद्ध राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.