घारगाव ( जि. अहमदनगर) : गेल्या दोन दिवसांत संगमनेर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मोठा उष्माही जाणवत होता. रविवारी रात्री (दि.५) आठ वाजेच्या दरम्यान साकुर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बिरेवाडी शिवारात तुरळक गारांचा पाऊस पडला. वीजप्रवाह खंडित झाला होता.
सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा आदी मुख्य पिके आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात गहू, कांदे काढण्याचे काम सुरू आहे. रविवारी पंधरा ते वीस मिनिटे अचानक झालेल्या अवकाळी पावसाने गहू, कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सध्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. खर्चही फिटत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. अशातच अवकाळी पावसाचे संकट ओढवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बिरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे कीर्तन सुरू होते. अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची एकच धांदल उडाली. कीर्तनही थांबविण्यात आले.दहिगाव बाेलकातही पावसाची हजेरी
काेपरगाव तालुक्यातील दहिगाव बाेलका परिसरात काल सायंकाळी ९ च्या सुमारास अचानक साेसाट्याचा वारा अन् पाऊस सुरू झाला. ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने एकच धावपळ उडाली.