केडगाव : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबत मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरु आहेत. याप्रश्नी डॉ.सुजय विखे यांनी लक्ष घातले असून त्यांनी समितीच्या लोकांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तातडीने सर्व्हे आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना दिले. साकळाई योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्कता दर्शविल्याने लाभधारक शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागण्यासाठी नगर व श्रीगोंदा तालुक्यातील लाभधारक शेतक-यांनी लढा उभारला आहे. साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी रुई छत्तीशी आणि चिखली या ठिकाणी कृती समितीच्यावतीने वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह खासदार दिलीप गांधी, आमदार राहुल जगताप, लाभ धारक शेतकरी सहभागी झाले होते. साकळाई योजन मार्गी लागण्यासाठी कृती समिती व मुख्यंत्र्यांची बैठक लवकरच घडवून आणण्याचे आश्वासन विखे यांनी दिले होते. त्यानुसार डॉ. विखे पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन साकळाई कृती समिती व मुख्यंत्र्यांची बैठक घडवून आणली. यावेळी साकळाई कृती समितीच्या वतीने मुख्यंत्र्यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील, बाळासाहेब हराळ, रविंद्र भापकर, ज्येष्ठ साजसेवक राजाराम भापकर, नारायण रोडे, राहिदास उदमले, सोमनाथ धाडगे, सुरेश काटे, प्रताप नलगे, राजाराम लोटके, हेंमत नलगे, बाळासाहेब नलगे, नितीन दुबल, विश्वास थोरात, बाबा महाराज झेंडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी या योजनेची बारकाईने माहिती घेतली. या योजनेबाबत सकारात्मकता दर्शवित तातडीने सर्व्हे करण्याचा आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले.खुद्द मुख्यमंत्रांनीच साखळाई योजनेबाबत सकारात्मकता दर्शविल्याने नगर श्रीगोंदा भागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.पाचपुतेंनीही दिले निवेदनसाकळाई योजनेच्या पुर्ततेसाठी शनिवारीच आंदोलन झाले. यात खासदार दिलीप गांधी, सुजय विखे, दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्र्यासंमवेत बैठक आयोजीत करण्याचे आश्वासन दिले होेते. दिपाली सय्यद यांनी तर मुख्यमंत्र्याची २६ फेब्रुवारीला वेळ घेतली होती. मात्र सुजय विखे यांनी आज सर्वात आधी मुख्यमंत्र्याना गाठत त्यांच्या समवेत साकळाई साठी बैठक घेतली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्याना साकळाईसाठी निवेदन दिले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते.साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी लाभधारक शेतक-यांनी लढा उभारला आहे. पहिले पाऊल यशस्वी झाले आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यावर या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडे निधीसाठी जाण्या अगोदर राज्य सरकारची परवानगी असणे आवश्यक आहे. राज्य सरकारने प्राथकि मंजुरी दिली असल्याने योजना मार्गी लागण्या बाबात आशादायक चित्र निर्माण झाले आहे . - डॉ . सुजय विखे
‘साकळाई’ चा तातडीने सर्व्हे करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:22 AM
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबत मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे.
ठळक मुद्देसर्व्हे आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेशसाकळाई प्रश्नी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसंवेत मंत्रालयात बैठक