लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्या जिल्हावासियांनी अंमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक जागेवर मास्क वापरावे, तसेच कामाची जागा, उत्पादक आस्थापना या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. त्याचेच पालन व अंमलबजावणी करण्याबाबत सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये, विवाह व अंत्यसंस्कार या ठिकाणी गर्दी होणार नाही याचे नियमन करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयास संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक शिक्षा करावी, दारू, गुटखा, तंबाखू विक्रीवर बंदी असल्याने त्याचे सक्तीने पालन करावे, असे या आदेशात म्हटले आहे. सर्व कामाच्या ठिकाणी तापमान तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था करावी व सॅनिटायझर पुरवावेत, हात धुण्याच्या ठिकाणांची संख्या वाढवावी, कामाच्या ठिकाणी शिफ्टदरम्यान तासाभराचे अंतर ठेवावे, तसेच कर्मचाºयांच्या जेवणाच्या वेळा ठरवून द्याव्यात, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती व ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना घरून काम करण्यास प्रोत्साहित करावे. सर्व खासगी व सार्वजनिक कर्मचारी यांना आरोग्य सेतूच्या वापरास प्रोत्साहित करावे, सर्व संस्थांनी त्यांच्या कामाची जागा शिफ्टदरम्यान स्वच्छ करावी, मोठी संमेलने, बैठका प्रतिबंधित कराव्यात, असे यातून सूचवण्यात आले आहे. -------------उत्पादक आस्थापनांनी हे करावेउत्पादन आस्थापनाच्या ठिकाणी हाताळण्यात येणाºया पृृष्ठभागाची वारंवार साफसफाई करावी व सर्वांना हात घुणे अनिवार्य करावे. कॅन्टीनमध्ये भोजनांच्या वेळात अंतर ठेवावे. चांगल्या स्वच्छता पद्धतीबाबत (गुड हायजिन प्र्रॅक्टिसेस) सखोल संवाद व प्रशिक्षण आयोजित करावे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य,सार्वजनिक जागा, कामाची जागा, उत्पादक आस्थापनेवर पाळा सोशल डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 8:23 PM