भाऊसाहेब येवलेराहुरी : उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़ जिल्ह्यातील साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात अडचणीत येणार आहेत़ जिल्ह्यात केवळ ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक असल्याने साखर सम्राटांचे धाबे दणाणले आहेत़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत़ गेल्यावर्षी १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा होता़ यंदा मात्र उसाखालील क्षेत्र निम्म्याने घटले आहे़ पावसाळा लांबल्याने जनावरांच्या छावण्यासाठी उसाची मागणी वाढली आहे़ पावसाअभावी नव्याने गवत उगलेले नाही़ शेतात उभा असलेला उसही अखेरची घटका मोजीत आहे़ बागायती पट्ट्यात ऊस जळाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ओव्हर आॅयलिंगची तयारी सुरू ठेवली आहे़ १आॅक्टोबर रोजी कारखान्यांचे धुराडे पेटणार आहे़ याशिवाय कारखान्यांनी ऊस तोडणी कामगारांशी करारही करण्यास सुरूवात केली आहे़ कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे ऊस पळवापळवीचे धोरण चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत़ ऊस टंचाईमुळे काही कारखाने बंद राहणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे़ यंदा कमी गळीत करून साखर कारखाने चालवावे लागणार आहेत़ त्यामुळे भावाची स्पर्धाही होण्याची शक्यता आहे़जनावरांच्या चाºयासाठी ३५०० ते ४००० रूपये टन ऊस वाढे, पाचराटासह विकला जात आहे़पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरीही ऊस जनावरांच्या छावण्याला विकत आहेत़ मका चार संपलेला आहे़ तणनाशकामुळे बागायती भागातही गवत उपलब्ध नाही़ घासावर लष्करी अळी पडल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरविले आहेत़ जनावरांसाठी ऊस चारा हा एकमेव पर्याय असल्याने पशुधन वाचविण्यासाठी शेतकºयांची त्रेधातिरपट उडाली आहे़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहे़ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे़ जनावरांच्या छावण्यासाठी उसाचा वापर होत आहे़ आॅगष्टमध्ये साखर कारखाने कमीशनरकडे ऊस गाळपाची परवानगी घेतली़ पावसाळा लांबल्याने जनावरांसाठी चाºयाचा वापर वाढला आहे़ -राजेंद्र पाटील, प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर.बागायती पट्ट्यात पावसाअभावी उसाचे क्षेत्र संकटात सापडले आहे़ जनावरांच्या छावण्यांकडून उसाला चारा म्हणून मागणी वाढलेली आहे़ छावण्यासाठी शेतकºयांच्या शेतात येऊन चारा तोडून नेला जात आहे़ शेतीसाठी पावासाची गरज असून उभी पिके वाचविण्याचे शेतकºयांपुढे आव्हान आहे़ -भाऊराव ढगे, ऊस उत्पादक शेतकरी.