बोराळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सध्या जमिनीचे भौतिक गुणधर्म व सूक्ष्म जिवाणूंची संख्या घटली आहे. जमिनीवरचा एक इंच सुपीक थर वाहून जात असल्याने सुपीकता निर्देशांक घसरला आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व गावातील ग्रामपंचायत कार्यालयात गावातील जमिनीचे जमीन सुपीकता निर्देशांक फलक लावले आहेत.
जमीन आरोग्य पत्रिकेनुसार पिकांना आवश्यक असलेल्या घटकांचे नियोजन करून त्या मात्रेत खते द्यावीत तसेच आपल्या क्षेत्रासाठी किती खत आवश्यक आहे, याचा आढावा घेऊन सेंद्रिय खतांचे प्रमाण वाढवावे. यातून रासायनिक खतांच्या वापर दहा टक्के कमी होतो.
शेतकऱ्यांनी खत शिफारशीचा वापर करून सूक्ष्म अन्नद्रव्य, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खतांचाही वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.