विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी येथे सोमवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी ४५ वयावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. खरातवाडी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे ज्येष्ठांचे हाल ाहोत असे. त्यामुळे खरातवाडी येथे एक दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सोमवारी खरातवाडी येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर यांनी लसीकरण मोहीम राबविली. या ठिकाणी ८५ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. जयदेवी राजेकर यांना आरोग्य सहायक दीपक गोधडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पोपट दिवटे, परिचारिका आर्चना पाडळे व जयश्री पवार, आशा सेविका शोभा पाडळे व खरात यांनी सहकार्य केले.
310521\img_20210531_154107.jpg
खरातवाडी ता.श्रीगोंदा येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.