चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील सांडवे येथे पंचायत समितीचे माजी सभापती इंजि. प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून ६० वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जि. प.चे सदस्य संदेश कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उप तालुकाप्रमुख जिवाजी लगड, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी काझीचे डॉ. डॅनियल वाघमारे, डॉ. गीते, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.
कॅम्प यशस्वीतेसाठी सरपंच मंगल निक्रड, उपसरपंच परशुराम घोलप, माजी सरपंच अजय बोरुडे, गणेश खांदवे, अमोल निक्रड, बाळासाहेब खांदवे, बापूराव खांदवे, ग्रामसेवक सागर खळेकर, दिनेश करांडे, महेश खांदवे, त्रिंबक आरू, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकवर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.