कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सभापती शेटे यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, चंदनापुरीचे सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, माजी सरपंच सुनीता रहाणे, पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे, चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला कौटे, डॉ. शार्दूल देशमुख, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी रणजीत भोर, औषध निर्माण अधिकारी ज्ञानेश्वर देखणे, हिवताप पर्यवेक्षक विनायक वाडेकर, नागेश भोसले, एल. एस. पाखरे, विजय खैरे, सुशीला खडांगळे, सुनीता कारंजकर, सुनीता चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
शेटे म्हणाल्या, कोरोनाचे संकट असताना आपण सर्वांनीच या संकटाचा धीराने मुकाबला केला. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असताना प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन देखील त्यांनी केली.
डॉ. घोलप म्हणाले, चंदनापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत २१०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आदींनी लस टोचून घेतल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले.