अहमदनगर : आनंदधाम येथील जैन साधू-साध्वी यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस देण्यात आला. यावेळी आ. अरुणकाका जगताप, आ. संग्राम जगताप, युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. आलोकऋषीजी म. सा., जितेंद्रऋषीजी म. सा., अचालऋषीजी म. सा, अक्षयऋषीजी म. सा.,अमृतऋषीजी म.सा., नरेंद्र बाफना, संजय ताथेड, अनिल दुगड, संतोष बोथरा, नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, नगरसेवक विपुल शेटीया आदी उपस्थित होते.
यावेळी गेल्या दीड वर्षापासून मानवी जीवनावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट ओढवले आहे. या संकटावर मात करण्यासाठी कोरोना रोगप्रतिबंधक लसीकरणाची खरी गरज आहे. आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना संकट काळामध्ये आपली जबाबदारी सक्षमपणे पार पडली. नागरिकांसाठी अहोरात्र झटले. कोरोनाच्या अतिसंवेदनशील रुग्णांना उपचारासाठी मदत करत होते. कोविड रुग्णांना औषधे, बेड, उपलब्ध करून देत आहे. नगर शहरामध्ये कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत असे उद्गार कुंदनऋषीजी म. सा. यांनी केले.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, महाराष्ट्राला साधू संतांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या विचाराने आज आपण सर्वजण चालत आहोत. त्यांची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे.
संजय चोपडा म्हणाले की, जैन समाजाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी साधू-साध्वी देशभर भ्रमंती करीत असतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे रेशनकार्ड, आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यास मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. परंतु आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत हे लसीकरण करून घेतले.
---------
फोटो- १० आनंदधाम
आनंदधाम येथील साधू-साध्वींना गुरुवारी लसीकरण करण्यात आले. यावेळी आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, गणेश भोसले, संजय चोपडा, प्रा. माणिक विधाते आदी.