पळवे : पळवे ग्रामपंचायत, पाडळी रांजणगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र पळवे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने पाडळी रांजणगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा कॅम्प घेण्यात आला असून यामध्ये पाडळी-कळमकरवाडी येथील १८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
पाडळी रांजणगाव येथे प्रथमच लसीकरण कॅम्प घेण्यात आला. पाडळी रांजणगावचे सरपंच तथा पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर व पळवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुदाम बागल यांच्या हस्ते लसीकरण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच वैशाली करंजुले, पाडळी रांजणगावचे डी. बी. करंजुले, ग्रामपंचायत सदस्या अर्चना करंजुले,
तंटामुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब साठे, सुभाष पाटील, विठ्ठलराव साठे, सोसायटी संचालक किरण साठे, अरुण उबाळे, भाऊसाहेब उबाळे, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
.............
फोटो ओळी : पाडळी रांजणगाव येथे लसीकरण कॅम्पचा शुभारंभ करताना सरपंच विक्रमसिंह कळमकर, पळवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुदाम बागल आदी.