श्रीगोंदा : तालुक्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील आठवड्यात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते अन्य दहा बारा कार्यकर्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत.
शनिवारी राजेंद्र म्हस्के व वैभव पाचपुते यांनी सोनईत जिल्हा परिषद सदस्य प्रशांत गडाख यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी भानगावचे शरद कुंदाडे यांनी मध्यस्थी केली आहे.
प्रशांत गडाख यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कानावर हा विषय घातला.श्रीगोंद्यात धनुष्यबाणाचा जलवा करण्यासाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी गडाख पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
वैभव पाचपुते यांनी काष्टीत शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा चंग बांधला आहे. बाजार सभापती उपसभापती निवडीपासून पाचपुते नाराज असून त्यांनी सोनई गाठली. सध्या दोन्ही कॉग्रेस व भाजपातील दुसºया फळीतील कार्यकर्ते नाराज आहेत. ते शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत.