भेंडा : भेंडा बुद्रुक (ता. नेवासा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली शिवाजी शिंदे तर उपसरपंचपदी दादासाहेब गजरे यांची बिनविरोध निवड झाली.
सरपंचपद सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी वैशाली शिंदे, उषा मिसाळ, सुहासिनी मिसाळ असे तीन तर उपसरपंचपदासाठी दादासाहेब गजरे यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. उषा मिसाळ व सुहासिनी मिसाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सरपंचपदी वैशाली शिंदे, उपसरपंचपदी दादासाहेब गजरे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय गोरक्षनाथ मिसाळ, उषा मिसाळ, स्वाती वायकर, दिलीप गोर्डे, माया गंगावणे, सुहासिनी मिसाळ, संगीता गव्हाणे, संगीता शिंदे, पंढरीनाथ फुलारी, रोहिणी निकम, अण्णासाहेब गव्हाणे, कादर सय्यद, मंगल गोर्डे, स्मिता काळे, लताबाई सोनवणे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुळा पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता ज्ञानेश्वर शिवगण तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे यांनी काम पाहिले.