नवनागापूर/निंबळक :
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे, असे प्रतिपादन डॉ. बबनराव डोंगरे यांनी केले.
नवनागापूर (ता.नगर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा पदभार डॉ. बबनराव डोंगर यांनी तर उपसरपंचपदाचा पदभार संगिता सप्रे यांनी सोमवारी स्वीकारला. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महेश कांडेकर, गोरक्षनाथ गव्हाणे, मगल गोरे, कल्पना गिते, दीपक गिते, रंजना दांगट, सागर सप्रे, हेमा चव्हाण, सत्यभामा डोंगरे, अर्जुन सुनवणे, राहुल भोर, सुशीला जगताप, संगीता भापकर, स्वाती सप्रे आदी उपस्थित होते.
डोंगरे म्हणाले, नवनागापूर येथील नागरिकांना एमआयडीसीमधून पाणी मिळत आहे. ही योजना गेल्या ४० वर्षापूर्वीची असल्यामुळे वारंवार नादुरूस्त होत आहे. त्यामुळे नवनागापूरचा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. विकास आराखडा तयार करून नियोजन पूर्वक टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लावणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
यावेळी दत्तापाटील सप्रे, नरेश शेळके, विजय शेवाळे, योगेश गंलाडे, राजू शेवाळे, हनुमंत
कातोरे, सुभाष दांगट, संजय गिते, ज्ञानदेव सप्रे, अशोक शेळके, किशोर वाकळे, शंकर शेळके, नवनाथ
गव्हाने, चंद्रभान डोंगरे, संजय चव्हाण, निलेश शेवाळे, सुभाष ठेपे, शिवराज सप्रे, बाबासाहेब दांगट, अर्जुन
गोरे, रशिद पठाण, अक्षय पिसे, सुनंदा डोंगरे, रवि वाकळे, महेश गलांडे, बाबासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते.
फोटो : १५ नवनागापूर सरपंच
नवनागापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पदभार स्वीकारताना.