अहमदनगर : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते हे वाहतूक समस्यांचे मूळ कारण असले तरी पुरेशी वाहनतळांची सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने विस्कळीत स्वरुपात उभी असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशावरून शहरातील नऊ चौक पार्किंग निषिद्ध करण्यात आले आहेत. चौकापासून २५ मीटर अंतरापर्यंत कोणालाही वाहने पार्किंग करता येणार नाही, असा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला असून त्याची एक जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.महापालिकेने रस्त्यावरील वाहनतळांमध्ये पी-१ आणि पी-२ पद्धतीचे नियोजन केले आहे. पूर्वीचे नियोजन आणि त्यात नव्यारस्त्यांवरही असे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यालगतच्या काही मोकळ््या खासगी जागांवर वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. खासगी जागांवरील वाहनतळांबाबतचा निर्णय जमीनधारकांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी वाहनतळांची यादी जाहीर केली असून पार्किंगनिषिद्ध चौक जाहीर केले आहेत.जिल्हा रुग्णालयात देणार अधिकृत ठेकाजिल्हा रुग्णालयात अनधिकृत पद्धतीने वाहनचालकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत गेल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयास पत्र देऊन त्यांचेही पार्किंग १ जुलैपासून अधिकृत करून घेण्याचा आदेश दिला आहे. याबाबत निविदा प्रसिद्ध करून तो ठेका अधिकृतपणे देण्यात यावा, असे बजावण्यात आले आहे. अवैधपद्धतीने पार्किंग ताब्यात घेणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त द्विवेदी यांनी दिला आहे.सशुल्क पार्किंगचा महापालिकेत ठरावशहरात सशुल्क पार्किंगचा ठराव महापालिकेच्या १४ आॅगस्ट २०१७ रोजीच्या सभेत मंजूर करण्यात आला. शहर वाहतूक शाखेने पार्किंग निषिद्ध ठिकाणे आणि वाहनतळांच्या जागांना मान्यता दिली आहे. महासभेनेच पार्किंगचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार ० ते २ तास (५ रुपये), २ ते ५ तास (८ रुपये), ५ ते ७ तास (१० रुपये), ७ ते १० तास (१५ रुपये), १० तासांपेक्षा जास्त (२५ रुपये) असे दुचाकी वाहनांसाठीचे पार्किंग शुल्क निश्चित करण्यात आले असून चारचाकी वाहनांसाठीही वेगळे दर राहणार आहेत.येथे होणार पी-१, पी-२ ची अंमलबजावणीभिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हडको, प्रोफेसर कॉलनी चौक ते फुलारी पेट्रोल पंप, कोठी रोड ते हॉटेल यश पॅलेस, नीलक्रांती चौक ते चौपाटी कारंजा, चौपाटी कारंजा ते तेलीखुंट ते एम. जी. रोड, नेता सुभाष चौक ते नवीपेठ, शहर सहकारी बँक चौक,भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा रंगभवन, जुना कोर्ट ते कलेक्टर कचेरीपर्यंत.प्रस्तावित वाहनतळांच्या जागासातभाई मळा, मानकर गल्ली, बनेसाब पटांगण, सेंट मोनिका हायस्कूल, जुने सिव्हिल हॉस्पिटल, बेलदार गल्ली, मिसगर हायस्कूल मागे, बेलदार गल्ली, मंगलगेट, मटन मार्केटसमोर, वस्तू संग्रहालय, पोलीस लाईनलगत, गाडगीळ पटांगण, गांधी मैदान, इमारत कंपनी, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय, चाँद सुलताना हायस्कूलसमोर, पांजरपोळची जागा (टॅक्सी, लक्झरी बसथांबा), वाडिया पार्कच्या दक्षिणेकडील जागा, राष्ट्रीय पाठशाळा, सावेडी जॉगिंग ट्रॅकच्या पूर्वेकडील भिंत, आयएएमएस हॉस्पिटलजवळ, फलटण चौकीजवळ, पुणे बसस्थानकाजवळ, लालटाकी रोड (पाठक हॉस्पिटलसमोरील झेड. पी. कंपाऊंड), नोबल हॉस्पिटल कंपाऊंडलगत, अमरधामच्या पश्चिमेकडील कंपौंडलगत, मूकबधिर विद्यालय (टिळक रोड)या चौकात पार्किंगला बंदीभिस्तबाग चौक, प्रोफेसर चौक, दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, नेता सुभाष चौक, तेलीखुंट, भिंगारवाला चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय ( या चौकाच्या चारही बाजूंनी २५ मीटरपर्यंत कोणालाही त्यांची वाहने पार्किंग करता येणार नाहीत.)