पुण्याकडून येणाऱ्या वाहनधारकांकडे ई-पासेस आहेत का? मास्क लावले आहे का? विनाकारण कोण फिरत आहे का? याची खातरजमा केली जात आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. लक्झरी बसेसमध्येही तपासणी केली जात आहे. प्रमाणापेक्षा जास्त नागरिक असणाऱ्या बसेस परत पाठविल्या जात आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने केले आहे
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व दंड न भरता मुजोरी करणाऱ्यांना लाठीचा प्रसादही दिला जात आहे. बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे, हेड कॉन्स्टेबल हसन शेख, संतोष गोमसाळे, ज्ञानेश्वर पठारे, एम. के. कोळपे, एस. वाय. जरे, महिला पोलीस नाईक एस. एस. काळे, पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी तसेच होमगार्डचे महेश लगड, स्वप्निल शेंडगे, सागर लगड आदी तपासणी नाक्यावर तपासणी करीत आहेत.
...........
एकही गाडी ई-पास शिवाय सोडली जात नाही. लक्झरी बसेसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असणाऱ्या गाड्या पुन्हा पुण्याकडे रवाना करत आहोत. घरी रहा, सुरक्षित रहा, आपल्या बरोबर इतरांचाही काळजी घ्यावी. तसेच लोकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
-संपतराव शिंदे, पोलीस निरिक्षक
..........
नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करताना संपतराव शिंदे व कर्मचारी.