शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Video - आळेफाटा चौकात ट्राफिक जाम, पारनेरचे आमदार निलेश लंके भरउन्हात उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 10:27 AM

आळेफाटा येथे ट्रॅफिक जाम लागलेलं. कित्येक वाहने अडकून पडलेली. हे दृष्य पाहून तेथून निघालेले पारनेरचे आमदार निलेश लंके गाडीतून उतरले.

घारगाव ( जि. अहमदनगर) :  रविवारच्या सुट्टीचा दिवस आणि लग्नाची तिथ असल्याने आळेफाटा चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर प्रचंड वाहतूक त्यातच पाऱ्याने चाळीशी ओळांडल्याने सहन न होणारे ऊन. अशात आळेफाटा येथे ट्रॅफिक जाम लागलेलं. कित्येक वाहने अडकून पडलेली. हे दृष्य पाहून तेथून निघालेले पारनेरचे आमदार निलेश लंके गाडीतून उतरले. सोबतच्या कार्यकर्त्यांसह चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांना पाहून प्रथम आसपाचे दुकानदार मदतीला आले. काही वेळात भर उन्हात अडकून पडलेल्या वाहनचालकांची सुटका झाली.

पारनेरचे आमदार निलेश लंके रविवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देहणे येथे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. सोबत बापू शिर्के, चंद्रकांत मोढवे, संदीप शिंदे, भाऊ साठे, ओंकार गारूडकर हे कार्यकर्ते होते. आळेफाटा येथून जात असताना चौकात नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच काळ वाहतूक सुरू होती नव्हती. त्यामुळे पुढचा मागचा विचार न करता आमदार लंके उघड्या डोक्याने गाडीतून खाली उतरले. चालतच चौकात आले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही आले. त्यांनी तेथे वाहतूक पोलिसांना मदत करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केला.

चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. प्रत्येकाला पुढे जायची घाई. डोक्यावर आग ओकणारा सूर्य. अशा परिस्थितीत आमदार लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हे प्रयत्न पाहून आसपासचे दुकानदार त्यांच्या मदतीला धावून आले. पोलिसांसोबत काही काळ वाहतूक सुरळीत करत आमदार लंके आणि त्यांचे कार्यकर्ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.दरम्यान, एसटी बस आणि इतर वाहनांत तासंतास अडकून पडलेल्या प्रवाशांची सुटका झाली. चौकातून जाताना खुद्द आमदार वाहतूक नियंत्रण करीत असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशी त्यांना धन्यवाद देत होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTrafficवाहतूक कोंडी