घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगावमधील तरुणांनी एकत्र येऊन मोफत ५० बेडचे शिवशंभो कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे शनिवारी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी भेट दिली. तेथील कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. गावकरी व तरुणांचे कौतुक केले. त्यांनी ५० हजार रुपयाचा धनादेश कोविड सेंटरला दिला. ग्रामपंचायतीच्या वतीने एक लाखाचा धनादेश देण्यात आला. गावातील डॉ. चंद्रशेखर कळमकर, डॉ. विनायक शिंदे रुग्णांची मोफत वैद्यकीय सेवा करीत आहेत. घारगावमधील सर्व शिक्षकांनी १ लाख ५६ हजाराची देणगी दिली. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, सरपंच अरुणा खोमणे, संगीता खामकर, रमेश खोमणे, ग्रामविकास अधिकारी माणिक होणकर्पे, अण्णासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.
घारगाव कोविड सेंटरला विखेंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:19 AM