शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

विखेंनी नगर-नाशिक-मराठवाडा वाद पेटविला- दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 8:03 PM

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला.

कोपरगाव : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला. आमच्यावर टीका करण्यात शक्ती वाया घालविण्याऐवजी पश्चिमेस वाहून जाणारे पाणी अडवून जिल्हा सुजलाम सुफलाम करावा, असा टोला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी येथे विखेंना लगावला.भोजडे येथे शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते. संपर्कप्रमुख दिलीप नाईक, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख नाना बावके, नाशिकचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा संघटक विजय काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदी उपस्थित होते.भुसे म्हणाले, अहमदनगर हा सहकार व साखर सम्राटांचा जिल्हा असताना या भागातील शेतक-यांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. जून २०१७ अखेरपर्यंतच्या कर्जदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांची तुटपुंजी कर्जमाफी वाढवून देण्याची आमची भूमिका आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, तर अंमलबजावणी झाली पाहिजे. सेनेला संपवायला निघालेले नारायण राणे व छगन भुजबळांची अवस्था काय झाली? हे उभा महाराष्ट्र बघत आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागावे, असे सांगत एक वर्ष पक्षासाठी द्या, सरकार भगव्याचे असेल, असे भुसे यांनी सांगितले.भोजडे ग्रामपंचायत इमारतीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून ११ लाख २० हजारांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. लोखंडे यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून आपल्या हक्काचे पाणी आपल्याच भागात जिरवा, असे आवाहन करीत पश्चिमेकडून समुद्रात वाहून जाणारे ४ दशलक्ष घनफूट पावसाचे पाणी अडवून कोरडवाहू शेतक-यांना देण्यासाठी ४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिल्याचे सांगितले. तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. अशोक कानडे यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब थोरात यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव