तालुक्यातील युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने कोरोनायोद्धा, पत्रकार, शिक्षक, उद्योजक, संघटना व शेतीनिष्ठ शेतकरी यांचा शनिवारी भास्कर पेरे पाटील, पद्मश्री राहीबाई पोपेरे, आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रसंगी पेरे पाटील यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर होते. व्यासपीठावर पद्मश्री पोपेरे, आमदार डाॅ. लहामटे, डाॅ. अजित नवले, नामदेव गंभिरे, कारभारी उगले, प्रकाश मालुंजकर, बी.जे. देशमुख, नितीन गोडसे, वसंत मनकर, किसन हांडे, उत्कर्षा रूपवते, शर्मिला येवले, माधव हासे, अजित देशमुख उपस्थित होते. शेतकरी नेते झुंबरराव आरोटे, विडी कामगार चळवळीतील नेते वकील शांताराम वाळुंज यांना जीवनगौरव पुरस्काराने तर काॅम्रेड डाॅ. नवले, मुरलीधर हासे, शांताराम गजे, जतीन साठे, प्रदीप हासे, संभाजी भिंगारे यांना सन्मानित करण्यात आले.
पेरे म्हणाले, बाहेरून कोणी येईल आणि गावाचा विकास होईल, या भ्रमात राहू नका. एकमेकांना सहकार्य करून आपणच आपल्या गावाचा विकास करा. सजग व्हा. विज्ञानाची कास धरा, पण जुने ते सोने हे विसरू नका. युवा स्वाभिमानचे संस्थापक महेश नवले यांनी प्रास्ताविक केले. सुरेश नवले, अमोल पवार, स्वप्निल नवले, सुनील पुंडे, रवी भास्कर नवले, वैभव सावंत, शुभम आंबरे, भरत नवले, योगेश राक्षे, रावसाहेब भोर यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रम घेतले.