अहमदनगर: चिरंजीव डॉ़ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली़ मात्र आपण पक्षाकडे राजीनामा दिला नसल्याचा खुलासा विखे यांनी माध्यमांकडे केल्याने राजीनामा नाट्यावर अखेर सायंकाळी पडदा पडला़लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत एकत्रित बैठक बोलविण्यात आली होती़ राज्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते दिल्लीत दुपारी दाखल झाले़ त्याचवेळी वृत्तवाहिनीवर विखे यांनी हायकमांडकडे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त धडकले़विखे यांनी तातडीने राजीनामा वृत्ताचे खंडन केले़ परंतु, एका वृत्तवाहिनीने विखे यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिल्याने अन्य वाहिन्यांनी ते प्रसारीत केले. त्यामुळे विखे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली़ त्यांची पुढील भूमिका काय असणार, ते भाजपमध्ये प्रवेश करतील का, चिरंजीव सुजय यांचा प्रचारात ते सक्रिय होतील का, यासह अनेक मुद्यांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली़ परंतु, काही वेळातच विखे यांनी आपण कुणाकडेही राजीनामा दिलेला नसल्याचा खुलासा केला़ पण, तोपर्यंत सोशल मीडियावर त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरले होते. विखे यांनी राजीनामा वृत्ताचे खंडन केल्याचे वृत्त कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांच्यावतीने एकप्रकारे खुलासाच केला़विरोधी पक्षनेते नगरमध्येचविधानसभेचे विरोधी पक्षनेते विखे हे मंगळवारी दिवसभर मतदारसंघात होत़े़ ते मुंबईला किंवा दिल्लीला गेलेले नाहीत़ सकाळी ते त्यांच्या निवासस्थानी होते़ त्यांनी कार्यकर्त्यांशीही संपर्क साधला, अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली़ त्यामुळे या राजीनामा नाट्यावर पडदा पडला़
विखेंच्या राजीनामा नाट्यावर तूर्त पडदा, विरोधी पक्षनेतेपद कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:26 AM