लोकमत न्यूज नेटवर्कजवळे : पारनेर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना कोरोनाच्या लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. जवळे येथील शेतकरी राजेंद्र भीवा सालके यांनी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून दोन एकर क्षेत्रात द्राक्षांची लागवड केली. मात्र कोरोनामुळे सर्वत्र मार्केट बंद असल्याने द्राक्षाचे भाव कोसळले. विक्री कोठे करावी व कशी करावी, याची चिंता सालके यांच्यासारख्या अनेक शेतकºयांना आहे.पारंपारिक शेतीला फाटा देऊन द्राक्ष शेती करण्याचा निर्णय सालके यांनी घेतला. मात्र कोरोनाचे संकट उभे राहिले आणि सारीच स्वप्ने धुळीस मिळाली. लॉकडाऊनमुळे द्राक्षे विक्रीचे संकट समोर उभे राहिले. ग्राहकांना ताजे व बागेतील द्राक्षे ३० रुपये किलोने विक्री करावी लागत आहेत. आतापर्यंत १५ ते २० लाख रुपये खर्च झाला आहे. शेतीची मशागत द्राक्ष लागवडीसाठी लोखंडी मंडप, शेतीची अवजारे, औषधे खते, फवारणी इत्यादीसाठी खर्च झाला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील बँक आॅफ इंडियातून बारा लाखांचे कर्ज घेतले होते,असे शेतकरी सालके म्हणाले.---फोटो-पारनेर तालुक्यातील जवळे परिसरातील राजेंद्र सालके यांच्या बागेतील द्राक्षे बागेतच राहिली आहेत.
द्राक्ष बागायतदार संकटात,१५ ते २० लाखांचा तोटा : बाजारपेठ नसल्याने द्राक्ष्यांचे शेतातच नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:35 PM