आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, सतीश बोरा, अमित बगाडे, बापू गोरे, सुरेश भंडारी, अशोक खेंडके, बाळासाहेब महाडीक, संदीप नागवडे, बाळासाहेब गांधी यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात बैठक झाली.
पाचपुते म्हणाले, जनतेचे आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने मिनी लाॅकडाऊन सुरु झाला. जनता व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे.
स्वाती दाभाडे म्हणाल्या, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोना आचारसंहितेचा भंग केला तर कारवाई करणार आहे. सतीश बोरा म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यात कमी रूग्ण आहेत. त्यामुळे एक दिवसाआड दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा शहरात फिरुन कोरोना आचारसंहिता अंमलबजावणीचा आढाव घेतला.