श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सकाळीच अफवांचे पीक पसरले आहे. अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिल्याची बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी व्हायरल झाली. ‘लोकमत’ने याबाबत सत्यता पडताळली असता ही बातमी खोटी असल्याचे निदर्शनास आले. खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत अपक्ष उमेदवार वाकचौरे यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नसल्याचे सांगितले.आज सकाळी मतदानास सुरवात होण्यापूर्वी वाकचौरे यांनी बातमी पसरली. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या शिष्टाईला यश आले आहे. वाकचौरे यांनी सेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याची बातमी व्हायरल झाला. बातमीची सत्यता तपासून पाहिली असता ही अफवा असल्याचे समोर आले. कुणीतरी मतदानात लाभ उठवण्यासाठी अफवा पसरवून मतदारांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.यासंदर्भात उमेदवार वाकचौरे यांच्याशी संपर्क केला असता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेने वाकचौरे यांना पाठिंबा दिलेला आहे. या संघटनेचे जिल्हाहाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनीही असे काहीही घडलेले नाही व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते वाकचौरे यांचे काम करत असल्याचे सांगितले.मी कोणालाही पाठींबा दिला नाही- वाकचौरेमी शिवसेनेला पाठींबा दिल्याच्या एका वृत्तवाहिन्याच्या आधारे अफवा पसरवली जात आहे. मी याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याचबरोबर या अपप्रवृत्तीविरोधात न्यायालयात दावा ठोकणार आहे. विरोधकांनी अत्यंत खालची पातळी गाठत अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी शिर्डीमध्ये मतदानाचा हक्क बजावला असून संपूर्ण मतदारसंघात फिरत आहे. कार्यकर्ते व मतदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वाकचौरेंनी लोखंडे यांना पाठींबा दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे : पोलिसात दिली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:26 AM