केडगाव : बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील विश्वकर्मा पांचाळ-सुतार समाजाच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील राधाकृष्ण मंदिरात झालेल्या या सोहळ्यानिमित्त पिंपळनेर येथील गणेश महाराज शेंडे यांचे कीर्तन झाले.
या कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या वतीने बुऱ्हाणनगरचे नवनिर्वाचित सरंपच रावसाहेब कर्डिले यांच्यासह सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. शेंडे महाराज म्हणाले, जीवनात सुखी असताना भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे. म्हणजे, दु:खाच्या प्रसंगात तग धरता येते. नामस्मरणात असलेली ताकद ओळखली की, सर्व चिंतांचा विसर पडतो. भगवंताशी एकरूप होता येते.
यावेळी राधिका कलमदाणे, श्रद्धा कलमदाणे या विद्यार्थिनींनी भगवान विश्वकर्मा यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी विश्वकर्मा पांचाळ-सुतार समाज सामुदायिक मंडळाचे श्यामराव कलमदाणे, संतोष नगरकर, दत्तात्रेय नगरकर, गोकुळ कलमदाणे, सुभाष दुधाले, साईनाथ दुधाले, किशोर दुधाले, रमेश कलमदाणे, अमृत दुधाले, बालाजी कलमदाणे, संतोष कलमदाणे, ईश्वर दुधाले, संतोष दुधाले, रवींद्र दुधाले, विजय कलमदाणे, गणेश दुधाले, ज्योतिबा क्षीरसागर, यादव वाकचौरे, रामेश्वर तांबट, भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मण तांबट, बापूसाहेब औटी, सागर उंडे आदींनी योगदान दिले. या कार्यक्रमासाठी दत्ताभाऊ तापकिरे, सागर निमसे, अण्णा कचरे, रामभाऊ खर्से, रमेश बार्शीकर, राजू साळे आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.